भारतीय सैन्य दलातील नौसेना अधिकारी म्हणून कारकीर्द

भारतीय नौसेना अधिकारी हा सैन्य दलातील एक प्रतिष्ठीत अधिकारी असतो, जो एक प्रशिक्षीत सुसज्ज सैन्यांच्या तुकडीचे नेतृत्व आणि नियंत्रण करतो. तो एक असा अधिकारी असतो जो देशप्रेमाने प्रेरित होतोच पण त्याचबरोबर आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देतो व अवघडात अवघड निर्णय घेऊन ते पुर्ण करण्याची क्षमता राखतो. नौसेना अधिकारी भरतीसाठी नोकरी विषयक अंक, स्थानिक दैनिक वर्तमानपत्र यांत देशपातळीवर जाहिरात दिली जाते.Permanent Commissionआणि Short Service Commission यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी तसेच नौसेना प्रबोधनी आणि CDS द्वारे प्रवेश घेतला जातो. यासाठी संघ लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे लेखी परिक्षा घेतली जाते. यानंतर SSB मुलाखत घेऊन नौसेना मुख्यालयांच्या अटी आणि नियमांनुसार देशपातळीवर गुणांच्या आधारे प्राधान्यक्रम प्रमाणे निवडलेल्या विद्यार्थांची यादी जाहीर केली जाते. गुणवत्ता यादीप्रमाणे फक्त निवड केली जाते. नौसेनेतील प्रवेशासाठी उपलब्ध असलेले काही पर्याय

1) संघ लोकसेवा आयोगाच्या द्वारे प्रवेश (UPSC Entries)

अ) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) (नौसेना दल) तसेचनौसेना प्रबोधनी (N.A)

ब) Combined Defence Services परीक्षा (CDSE)

क) राष्ट्रीय छात्र सेना (NCC)

2) थेट प्रवेश :- Permanent Commission, पदवी पुर्व प्रवेश.

अ) 10+2 (बी.टेक साठी फक्त)

3) थेट प्रवेश :- Permanent Commission, पदवी नंतर प्रवेश.

अ) संगीत विभाग

ब) क्रिडा विभाग

क) कायदे / विधी विभाग

4) भारतीय नौसेना प्रवेश परीक्षा - Permanent Commission व Short Service Commission, पदवी नंतर प्रवेश.

i) वैमानिक (MR) - पुरुष व महिला

ii) वैमानिक (NMR) - फक्त पुरुष

iii) निरीक्षक (Obs) पुरुष व महिला

iv) हवाई वाहतुक नियंत्रक (ATC) - पुरुष व महिला

v) सामान्य सेवा कार्यकारी General Services – Executive(Gs / x)

vi) हायड्रो - फक्त पुरुष

vii) सामान्य सेवा General Services (तांत्रिक, विद्युत आणि अभियांत्रिकी)

viii) नौसेना वास्तुविद्याविशारद (Naval Architect) - पुरुष व महिला

ix) माहिती तंत्रज्ञान (IT) - फक्त पुरुष

x) दळणवळण/ गृह विभाग (Logistics)- पुरुष व महिला

xi) शैक्षणिक- पुरुष व महिला

xii) नौसेना शस्त्रनिर्मिती निरीक्षक दल Naval Armanent Inspectorate Cadre (NAIC) - पुरुष व महिला

2. SSCWomen NCC SPL.

राष्ट्रीयछात्रसेनाच्याप्रमाणपत्राच्याआधारेमहिलांनासैन्यदलातविशेषप्रवेशप्रक्रियाद्वारेअधिकारीपदावरभरतीहोतायेते. हीसेवादेखिल SSC अंतर्गतअसते व याबाबतजाहिरातभरतीमंडळाद्वारेजूनआणिडिसेंबरमहिन्यात, म्हणजेवर्षातूनदोनवेळानोकरीविषयकबातमीपत्र, स्थानिकवर्तमानपत्रयांतप्रकाशितहोते. पात्रतानिकष

5) University Entry Scheme (UES) Permanent Commission व Short Service Commission

i) SSC वैमानिक (MR) - पुरुष व महिला

ii) SSC वैमानिक (NMR) - फक्त पुरुष

iii) SSC निरीक्षक (Obs) - पुरुष व महिला

iv) SSC हवाई वाहतुक नियंत्रक (ATC) - पुरुष व महिला

v) PC/SSC सामान्य सेवा कार्यकारी General Services – Executive(Gs / x)

vi) SSC सामान्य सेवा General Services (तांत्रिक, विद्युत आणि अभियांत्रिकी)

vii) SSC नौसेना वास्तुविद्याविशारद (Naval Architect) - पुरुष व महिला

viii) SSC माहिती तंत्रज्ञान (IT) - फक्त पुरुष

ix) SSC दळणवळण/ गृह विभाग (Logistics) - पुरुष व महिला

x) SSC शैक्षणिक - पुरुष व महिला

xi) नौसेना शस्त्रनिर्मिती निरीक्षक दल Naval Armanent Inspectorate Cadre (NAIC) - पुरुष व महिला

1. संघ लोकसेवा आयोग प्रवेश परिक्षा (UPSC)

i) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(NDA)

यासाठीच्या परिक्षा UPSC द्वारे वर्षातून दोन वेळा घेतल्या जातात. यामध्ये लेखी परिक्षा, SSB मुलाखत, वैद्यकीय तपासणी व गुणवत्ता यादी याक्रमाने प्रवेश प्रक्रिया असते. गुणवत्ता यादी प्रमाणे प्राधान्य देवूनच निवड झालेल्यांना NDA प्रवेशाचे नियुक्ती पत्र संबंधीत अधिकारी कार्यालया मार्फत दिले जाते. अधिकारी प्रशिक्षण हे जानेवारी आणि जुलै महिन्यात सुरू होते. या प्रवेशाबाबतची जाहिरात जून आणि डिसेंबर महिन्यात प्रकाशित केली जाते.12 वी उत्तीर्ण किंवा 12 वी परिक्षेसाठी गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र विषय घेऊन बसणारे अविवाहीत विद्यार्थी (पुरूष फक्त) ज्यांचे वय 16 1/2 वर्षे आणि 19 वर्षे दरम्यान आहे हेच या परिक्षेसाठी पात्र ठरतात. आम्ही, आचार्य अकॅडमी येथे दहावीची परीक्षा संपल्यानंतर लगेचच या परिक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करतो जेणे करून 12 वी च्या सुरूवातीला (वयोमर्यादेत) प्रवेश परिक्षा विद्यार्थी देऊ शकतो व 12 वी पास होताच NDA मध्ये प्रवेश मिळवू शकतो. दहावी नंतर लगेच तयारी केल्याने NDA प्रवेश परिक्षेसाठीचे, वयोमर्यांदेप्रमाणे जास्तीत जास्त परिक्षेचे प्रयत्न करता येतात. सर्वसाधारण NDA प्रवेश परिक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे असते.

अनु क्र परिक्षा जाहिरातीची वेळ UPSC लेखी परिक्षा UPSC SSB by Navy NDAप्रवेश
1 NDA / NA I डिसेंबर / जानेवारी एप्रिल ऑगस्ट/ सप्टेंबर पुढील वर्षी जानेवारी
2 NDA / NA II जून / जुलै ऑक्टोबर/ नोव्हेंबर जानेवारी/फेब्रुवारी पुढील वर्षी जुलै

वयोमर्यादा:- 16 1/2 वर्षे आणि 19 वर्षे दरम्यान

नागरित्त्व:- भारतीय

शैक्षणिकपात्रतानिकष :-12 वीउत्तीर्णकिंवा 12 वीपरिक्षेसाठीगणित, भौतिकशास्त्रआणिरसायनशास्त्रविषयघेऊनबसणारेविद्यार्थी जाहिरातीचा काळ :- संघ लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) जून आणि डिसेंबर मध्ये प्रवेशाबाबत जाहिरात नोकरी विषयक वृत्तपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत प्रकाशित केली जाते.

कमिशन :- Permanent Commission

ii) Combined Defence Services Exam.(CDSE)

सदर प्रवेश हा पदवीनंतर विद्यार्थांना घेता येतो. पदवी परिक्षेच्या शेवटच्या वर्षांसाठी किंवा शेवटच्या सत्र परिक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थांना या परिक्षेसाठी अर्ज करता येतो. CDS प्रवेश परिक्षा ही अधिकरी प्रवेश परिक्षा असल्याने UPSE सदर परिक्षा व मुलाखत (SSB Int) घेते. भारतीय नौसेना द्वारे वैद्यकिय तपासणी व नंतर गुणवत्ता यादी या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होते. गुणवत्ता यादी प्राधान्यक्रमानेनियुक्ती पत्र संबंधीत खाते अधिकाऱ्याच्या मार्फत पाठविले जाते. या प्रक्रियेतून नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण हे जानेवारी किंवा जुलै महिन्यात सूरू होते. या प्रवेशाची जाहिरात नोव्हेंबर / जुलै महिन्यात UPSC द्वारे प्रकाशित केली जाते. आम्ही आचार्य अकॅडमी येथे पदवीच्या दुसऱ्या वर्षात किंवा शेवटच्या सत्रा पुर्वी प्रवेश परिक्षेची तयारी सुरू करतो. यामध्ये विद्यार्थांचा शैक्षणिक अभ्यासक्रम व त्यांस तयारीसाठी लागणारी गरज लक्षात घेता अभ्याक्रम सुरू केला जातो. विद्यार्थी आपली अभ्यासक्रमाची गरज व परिक्षेच्या तयारीसाठी उपलब्ध असलेला वेळ पाहून आमच्याकडे अल्पकालीन किंवा दीर्घकालीन वर्गास प्रवेश घेऊ शकतात. जेणे करून त्यांची तयारी ही परिपुर्ण होऊ शकते. CDS परिक्षेचे वेळापत्रक हे साधारणत: खालील प्रमाणे असते.

अनु क्र परिक्षा UPSC जाहिरातीची (वेळ) महिना UPSC लेखी परिक्षेचा काळ SSB मुलाखतीचा काळ CDS प्रवेश
1 CDS Exam I नोव्हेंबर फेब्रुवारी/ मार्च सप्टेंबर/ ऑक्टोबर पुढील वर्षी जानेवारी
2 CDS Exam II जुलै ऑक्टोबर/ नोव्हेंबर जानेवारी/फेब्रुवारी पुढील वर्षी जुलै

वयोमर्यादा:- 19 to 24 years( For IMA, INA) 19 to 25 years, 20 to 24 years (For AFA) (For OTA) (at the time of commencement of course)

शैक्षणिकपात्रतानिकष :-पदवीनंतर आणि पदवी परिक्षेच्या शेवटच्या वर्षांसाठी किंवा शेवटच्या सत्र परिक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थांना या परिक्षेसाठी अर्ज करता येतो.

नागरित्त्व:- भारतीय

वैवाहिकस्थिती :- अविवाहित पुरूष आणि महिला

अर्जाचीपद्धत :- ऑनलाईनपद्धतीनेजाहिरकेलेल्यातारखेपर्यंतअर्जकरतायेतो.

जाहिरातीचा काळ :- संघ लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC) नोव्हेंबर आणि जुलै मध्ये प्रवेशाबाबत जाहिरात नोकरी विषयक वृत्तपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत प्रकाशित केली जाते.

कमिशन :-Permanent Commission for IMA, INA, AFA cadets and SSC for OTA cadets

iii) राष्ट्रीय छात्र सेना प्रवेश (NCC Entry)

अभियांत्रिकीपदवीधर किंवा तांत्रिक पदवीधर (BE/B.Tech) आणि ज्यांनी NCC चे ‘C’ सर्टीफिकेट नौसेना शाखेतून प्राप्त केले आहे अशा विद्यार्थांना CDS द्वारे नौसेनेत प्रवेश घेता येतो. संबधीत जागांची जाहिरात CDS प्रवेश परिक्षेबरोबरच प्रकाशित होते. SSB पास झालेल्या विद्यार्थांची निवड भारतीय नौसेनेत अखिल भारतीय गुणवत्ता यादी प्राधान्याने होते. यात निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण साधारणत: जानेवारी आणि जुलै महिन्यात सुरू होते.

सर्वसाधारणपात्रतानिकष :-

वय :- 19 to 22 years (For NA Goa) or19 to 25 years (For OTA) years (at the time of commencement of course)

वैवाहिक स्थिती :- अविवाहित पुरूष फक्त.

नागरिकत्व :- भारतीय

शैक्षणिकपात्रता:- Graduate with 50% aggregate in all semesters (For OTA) / BE/B.Tech आणि ज्यांनी NCC चे ‘C’ सर्टीफिकेट नौसेना शाखेतून प्राप्त केले आहे या विद्यार्थांना परिक्षेसाठी अर्ज करता येतो.

जाहिरातीचा काळ :- :- CDS प्रवेश परिक्षेबरोबरच नोव्हेंबर आणि जुलै मध्ये प्रवेशाबाबत जाहिरात नोकरी विषयक वृत्तपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत प्रकाशित केली जाते.

कमिशन:- :- Permanent Commission and SSC for OTA cadets

2) पदवीपूर्व थेट प्रवेश (10+2-B. Tech only) (Direct Entry-Permanent commission) :-

भारतीय नौसेनेत प्रवेशासाठी, 12 वी, PCM 70% आणि 10 वी / 12 वी इंग्रजी विषयात 50% गुण असणाऱ्यांना 10+2 B. Tech साठी प्रवेश मिळू शकतो. या प्रवेशासाठी सन जानेवारी 2017 पासून JEE (Mains) परिक्षेतील गुणवत्ता यादीतील क्रमांक/ स्थान हे आवश्यक आहे. ह्यासाठी वर्षातून दोनदा म्हणजे Spring Term and Autumn Term. असा प्रवेश उपलब्ध असतो. अभ्यासक्रम चालू होण्यापुर्वी 6 ते 8 महिने अगोदर अर्ज दाखल करण्याबाबतची जाहिरात नोकरी विषयक बातमीपत्र, महत्त्वाचे स्थानिक वर्तमानपत्र यांत प्रकाशित केली जाते. अर्ज मिळाल्यानंतर JEE(Mains) B.E/ B.Tech ची All India Rank प्राधान्य क्रमाने SSB मुलाखतीसाठी निवड होते.JEE (Mains) ची All India Rank ही CBSE/ NTA ने जाहिर केलेल्या तारखेपासून पुढे एक वर्ष फक्त ग्राह्य असते. SSB यशस्वी पुर्ण केलेल्या विद्यार्थांना उपलब्ध जागा आणि गुणवत्ता यादी प्राधान्यक्रम यांद्वारे नियुक्ती दिली जाते.

वय :- 17 ते 19 1/2 वर्ष

वैवाहिक स्थिती :- अविवाहित पुरूष फक्त.

नागरिकत्व :- भारतीय

शैक्षणिकपात्रता:- 12 वी, PCM 70% , JEE (Mains) परिक्षेतील गुणवत्ता यादीतील क्रमांक

जाहिरातीचा काळ :- :- नोव्हेंबर आणि जुलै मध्ये प्रवेशाबाबत जाहिरात नोकरी विषयक वृत्तपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत प्रकाशित केली जाते.

कमिशन:- :- Permanent Commission

3) थेट प्रवेश Permanent Commission, पदवी नंतर प्रवेश.

Permanent Commissionआणि Short Service Commissionया दोन्ही प्रवेशासाठी जाहिराती द्वारे अविवाहीत आणि पदवीप्राप्त विद्यार्थांचे अर्ज विशेष प्राविण्य असलेल्या संगीत, क्रिडा तसेच विधी विभागाकरीता उपलब्ध जागांच्याकरीता मागविले जातात. यासंबधीत जाहिरात ही नोकरी विषयक बातमीपत्र, स्थानिक वर्तमान पत्र यांत प्रकाशित केली जाते.

A. संगीतकार विभागातील प्रवेश :-

शैक्षणिक पात्रता :- मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी ( उच्च माध्यमीक शालान्त परिक्षेत संगीत विषय असणाऱ्यांस सवलत)

प्राविण्यपात्रता :- पियानो फोर्ट व्यतिरिक्त मिलिटरी बँड पथकातील कोणतेही एक वाद्य व्यवस्थित वाजवण्यांची क्षमता असावी. LRAM / ARCM / ATCL यांत diploma किंवा समान दर्जाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. अर्जदार विद्यार्थी हा स्ट्रींग / की- बोर्ड / वुडविंड / ब्रास / Percussion Instruments यांतील एखादेतरी वाद्य भारतीय आणि पाश्चात्य शैलीत वाजविण्यात प्राविण्य प्राप्त असावा. अर्जदार हा पाश्चात्य संगीत भाषांचे ज्ञान असलेला, ओरल अॅप्टीट्युड, संगीत विषयक लेखी अभ्यास, ज्ञान तसेच प्रत्यक्ष एखादे वाद्य वाजविण्याचे ज्ञान असलेला विद्यार्थी असावा.

प्राधान्य :-बँड किंवा ऑक्रेस्टा चालविण्यांचा अनुभव किंवा संगीत शिक्षक म्हणून अनुभव असल्यास प्राधान्य

वयोमर्यादा :-21 ते 25 वर्ष.

वैवाहिक स्थिती :- अविवाहित पुरूष फक्त.

नागरिकत्व :- भारतीय

जाहिरातीचा काळ :- एप्रिलमध्ये प्रवेशाबाबत जाहिरात नोकरी विषयक वृत्तपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत प्रकाशित केली जाते.

कमिशन:- Permanent Commission

अर्ज मिळाल्यानंतर संगीत विषयक प्राविण्य क्षमतेची प्राथमिक चाचणी घेतली जाते. यशस्वी उमेदवार पुढील मुलाखती आणि वैद्यकिय तपासाणीसाठी बोलाविले जातात. यशस्वी उमेदवारांना भारतीय नौसेनेत प्रशिक्षणासाठी गुणवत्ता यादी प्राधान्य क्रमाने उपलब्ध जागांसाठी नियुक्त केले जाते.

अर्जकरण्याची पध्द्त:- एप्रिल महिन्यात सदर जागे संबंधीत जाहिरात नोकरीविषयक बातमीपत्र स्थानिक वर्तमानपत्र यात प्रकाशित केली जाते. या जाहिरातील अर्ज किंवा त्या दिलेल्या नमुना अर्जाप्रमाणे कोऱ्या कागदावर तयार केलेला छापील अर्ज किंवा अधिकृत संकेतस्थळावरून घेतलेला अर्ज वापरता येतो. सदर पुर्ण भरलेला आणि सामान्य पोस्टाद्वारे (फक्त) पाठविलेला अर्ज स्विकारला जातो.

B. क्रिडा विभागातील प्रवेश

सर्वसामान्य पदवीत्तर पदवी किंवा अभियांत्रीकी किंवा तांत्रिक पदवीधारक यासाठी पात्र ठरतात. राष्ट्रीय क्रीडा संस्थांमधून क्रीडा प्रशिक्षण विषयात घेतलेली पदविका किंवा क्रिडा प्रशिक्षण विषयातून घेतलेली विज्ञान शाखेतील पदवीत्तर पदवी असल्यास प्राधान्य दिले जाते.

प्राविण्य पात्रता: -

i) याचींग व विंग सर्फींग वगळता इतर सर्व क्रीडा प्रकार

अर्जदार हा वरिष्ठ (सिनीयर) राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा किंवा चॅम्पियनशिप स्पर्धा खालील प्रकारांत सहभागी असावा. ॲथलेटीक्स, क्रास कंट्री, ट्रायथन, बॅडमिंटन, टेनिस, स्वाश, फुटबॉल, हॅडबॉल, हॉकी, बास्केट बॉल, क्रिकेट, जलतरण, डायविंग, वॉटर पोलो, कबड्डी, मुष्टीयुद्ध.

ii) याचींग व विंग सर्फींग

a)वरिष्ठ (सिनीयर) राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा जी YAI ने आयोजित केली आहेआणि यात अर्जदाराने कमीत कमी ऑलिंपिक दर्जाचे 5 वे स्थान मिळवीलेले असावे.

b) ISAF युथ सेलिंग वर्ड चॅम्पीयनशिप स्पर्धेत बोट किंवा विंडसर्फ प्रकारात 50% पर्यतचे स्थान प्राप्त असावे.

) आशियाई क्रिडा किंवा ISFA युथ सेलिंग वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेले असावे आणि युथ किंवा ऑलिंपीक दर्जाचे पदक प्राप्त असावे

वयोमर्यादा :-21 ते 25 वर्ष.

वैवाहिक स्थिती :- अविवाहित पुरूष फक्त.

नागरिकत्व :- भारतीय

जाहिरातीचा काळ :- एप्रिल मध्ये प्रवेशाबाबत जाहिरात नोकरी विषयक वृत्तपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत प्रकाशित केली जाते.

कमिशन:- :- Permanent Commission

C) कायदे / विधी विभाग

विधी विषयातील पदवीधारक या प्रवेशासाठी पात्र ठरतात. भरती कार्यालयामार्फत या जागांसंबंधात वर्षातून एकदा नोकरीविषय बातमीपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत जाहिरात एप्रिल मध्ये प्रकाशित केली जाते. या प्रवेशाबाबतचे पात्रता निकष खालील प्रमाणे.

वयोमर्यादा :-22 ते 27 वर्षे

वैवाहिक स्थिती :- अविवाहित पुरूष फक्त.

नागरिकत्व :- भारतीय

जाहिरातीचा काळ :- एप्रिल मध्ये प्रवेशाबाबत जाहिरात नोकरी विषयक वृत्तपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत प्रकाशित केली जाते.

कमिशन:- :- Permanent Commission

शैक्षणिक पात्रता:- 55 %गुण प्राप्तकरून LLB ची परिक्षा उत्तीर्ण पाहिजे तसेच बार कॉन्सिल ऑफ इंडिया / स्टेट यथे नोंदणीकृत होण्यास पात्र उमेदवार असावा. कायदे विषयातील पदवी धारकउमेदवार हा वकील म्हणून ॲडव्होकेटस् ॲक्ट, 1961 द्वारा नोंदणीकृत होण्यास पात्र असावा.

अर्ज करण्याची पध्द्त:- एप्रिल महिन्यात सदर जागे संबंधीत जाहिरात नोकरीविषयक बातमीपत्र स्थानिक वर्तमानपत्र यात प्रकाशित केली जाते. या जाहिरातील अर्ज किंवा त्या दिलेल्या नमुना अर्जाप्रमाणे कोऱ्या कागदावर तयार केलेला छापील अर्ज किंवा अधिकृत संकेतस्थळावरून घेतलेला अर्ज वापरता येतो. सदर पुर्ण भरलेला आणि सामान्य पोस्टाद्वारे (फक्त) पाठविलेला अर्ज स्विकारला जातो.

4. भारतीय नौसेना प्रवेश परिक्षा (INET)

भारतीय नौसेना मुख्यालयाद्वारे अधिकारी भरतीसाठी प्रवेश परिक्षा घेतली जाते. ही परिक्षा Permanent Commissionआणि Short Service Commission या दोन्ही सेवांसाठी एका वर्षात दोन वेळा घेतली जाते.I.N.E.T ची अधिकारी प्रवेश निवड परिक्षा ही संगणकीय लेखी स्वरूपात असते. ही परीक्षा चार विभागात घेतली जाते व प्रत्येक विभागात स्वतंत्र्यरित्या 40% गुण मिळवूण पास होणे क्रमप्राप्त असते. जाहिरातीत नमूद केलेल्या तारखेपूर्वी मिळालेल्या अर्जांनूसार पात्र ठरलेल्या उमेदवारांना परिक्षेसाठी बोलावीले जाते. संपूर्ण निवड प्रक्रियेत इलेक्ट्रानीक पध्द्तीने संपर्क केला जातो. I.N.E.T परिक्षेतील गुणवत्ता प्राधान्यक्रम यादी, उमेदवारांचेप्राधान्य व पसंती पाहता मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड केली जाते. उमेदवारांनी परिक्षेतील चारही विभागात पास होणे हे मुलाखतीसाठी आवश्यक आहे. अंतिम निवड यादीमध्ये लेखी परिक्षा व मुलाखत यांचे सम प्रमाणात गुण ग्राह्य धरले जातात.(प्रत्येकी 50%)

वयोमर्यादा :-19 to 24 वर्षे

वैवाहिक स्थिती :- अविवाहित पुरूष आणि महिला.

नागरिकत्व :- भारतीय

जाहिरातीचा काळ :- एप्रिल मध्ये प्रवेशाबाबत जाहिरात नोकरी विषयक वृत्तपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत प्रकाशित केली जाते.

कमिशन:- :- Permanent Commission

5. युनिवर्सल एन्ट्री स्किम (UES)

नौसेना मुख्यालयाद्वारे Permanent Commissionआणि Short Service Commission या दोन्ही प्रकारांसाठी परिक्षा घेतली जाते. ही परिक्षा वर्षातून एकदाच Autumn Term साठी भारतीय नौसेना अकादमी येथे घेतली जाते. देशस्तरावर विविध तांत्रिक महाविद्यालयांतून, सरासरी 60% गुण प्राप्त करणाऱ्या, सातव्या सत्रात शिकवणांऱ्या उमेदवारांना मुलाखतींद्वारे निवडले जाते. SSB Interview साठी या उमेदवारोना बोलावले जाते. यात यशस्वी ठरलेल्यांची पुढे वैद्यकिय तपासणी करून अंतिम गुणवत्ता यादी अखिल भारतीय स्तरावर जाहिरकेली जाते.

वयोमर्यादा :-22 ते 27 वर्षे

वैवाहिक स्थिती :- अविवाहित पुरूष आणि महिला.

नागरिकत्व :- भारतीय

जाहिरातीचा काळ :- एप्रिल मध्ये प्रवेशाबाबत जाहिरात नोकरी विषयक वृत्तपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत प्रकाशित केली जाते.

शैक्षणिक पात्रता :- या योजने अंर्तगत विविध विभागात अधिकारी म्हणून रूजू होण्यासाठी अभियांत्रिकी किंवा तांत्रिक शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. विविध विभागांसाठी आवश्यक असणाऱ्या शाखानिहाय पदवी खालील प्रमाणे

  • कार्यकारी शाखा :- यांत्रिकी, मरिन, एरोनॉटिकल, उत्पादन (Production) अभियांत्रिकी, संगणक शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान, Control अभियांत्रिकी, विद्युतअभियांत्रिकी, दूरसंचार, इलेक्टॉनिकस किंवा त्यासमान शाखेची पदवी
  • अभियांत्रिकी शाखा :- यांत्रिकी, , मरिन, एरोनॉटिकल, उत्पादन (Production), Control अभियांत्रिकी किंवा त्यासमान शाखेची पदवी
  • विद्युतशाखा :- विद्युतअभियांत्रिकी, दूरसंचार, इलेक्टॉनिक किंवा त्यासमान शाखेची पदवी
  • प्रशिक्षण शाखा :- यांत्रिकी, मरिन, एरोनॉटिकल, उत्पादन (Production) अभियांत्रिकी, संगणक शास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान, Control अभियांत्रिकी, विद्युतअभियांत्रिकी, दूरसंचार, इलेक्टॉनिकस किंवा त्यासमान शाखेची पदवी
  • वैमानिक निरीक्षण/ हवाई वाहतूक नियंत्रक/Naval Armanent Inspectorate Cadre: -BE/B-Tech (कोणत्याही शाखेतील) पदवी
  • माहिती तंत्रज्ञान शाखा :-संगणक शास्त्र, संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान शाखेची BE/ B. Tech पदवी

कमिशन:- :- Permanent Commission

Permanent Commission अंर्तगत सरकारने प्रशिक्षण शाखा, विधी (L.L.B) शाखा तसेच नौसेना वास्तुविद्याविशारद (Naval Architecture) परवानगी दिलेली आहे. Short Service Commission कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध जागा व गुणवत्ता यांनुसार सेवा योजनेत बदली दिली जाते.

नौसेना अधिकाऱ्यांसाठी खालील क्षेत्रांसाठी उपलब्ध असलेल्या संधींची संक्षिप्त माहिती खालील प्रमाणे.

अनु क्र उपलब्ध प्रवेश शाखा वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता
1 नौसेना वास्तुविद्याविशारद (Naval Architecture) 19 1/2 ते 25 वर्षे उमेद्वार हा किमान 60% गुण मिळवून खालील नमूद केलेल्या कोणत्याही अभियांत्रिकी (B.E) किंवा तांत्रिक शाखेचा (B. Tech)पदवीधर असावा. यांत्रिकी(Mech), स्थापत्य(Civil), एरोनॉटिकल, धातू शास्त्र (Metallurgy),Naval Architecture
2 निरिक्षक (Observer) 19 ते 24 वर्षे कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी (B.E) किंवा तांत्रिक शाखेचा (B.Tech) पदवी व 12 वी गणित व भौतिक शास्त्रासह उत्तीर्ण
3 प्रशिक्षण (Education) 21 ते 25 वर्षे भौतिक शास्त्र किंवा गणित विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची दूसऱ्या श्रेणीची Master Degreeअसावी. भौतिक शास्त्राची Master Degree असल्यास पदवी अभ्यासक्रमात गणित हा विषय दुय्यम पातळीवर अभ्यासलेला असावा आणि गणितात Master Degree पदवी असल्यास भौतिक शास्त्र दुय्यम पातळीवर अभ्यासलेला असावा किंवा दूसऱ्या श्रेणीची मान्यता प्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र किंवा इंग्रजी विषयाची Master Degree असावी. रसायन शास्त्रातील Master Degree असल्यास उमेदवाराने पदवी अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र विषय दुय्यम पातळीवर अभ्यासलेला असावा. किंवा इंग्रजीत प्राविण्य पदवी असल्यास भौतिकशास्त्र किंवा गणित विषय इंटरमिडीएट किंवा समांतर अभ्यासक्रम असावा किंवा यांत्रिकी, विद्यूत, संगणक शास्त्र किंवा तंत्रज्ञान विषयातील अभियांत्रिकी पदवी प्राप्त असावी. किंवा दूसऱ्या श्रेणीची, मान्यता प्राप्त विद्यापीठाची कंम्पुटर ॲप्लीकेशन किंवा संगणक शास्त्र विषयातील Master Degree असावी. उमेदवाराने पदवी अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र किंवा गणित विषयाचा अभ्यासक्रम घेतलेला असावा किंवाउमेदवारानेअर्थशास्त्र / इतिहास / राज्यशास्त्रविषयात Master Degree पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठातून घेतलेली असावी.
4 दळणवळण(Logistic)/ कामे (कार्यशाळा)(Works) अन्नपूरपवठा 19 1/2 ते 25 वर्षे दळणवळण विभाग- अभियांत्रिकी किंवा तांत्रिक पदवी प्रथम श्रेणीतूनकिंवा MBA प्रथम श्रेणीतून किंवा शास्त्र किंवा वाणिज्य किंवा माहिती तंत्रज्ञान विषयातून शास्त्र शाखेची प्रथम श्रेणीतीलपदवी आणि अर्थ शास्त्र विषयात, किंवा दळणवळण किंवा Supply Chain Management, साहित्य व्यवस्थापन विषयात पदवीत्तर पदवीला प्राप्त केलेली असावी. किंवा MCA /MSc(IT) प्रथम श्रेणी असावी. कार्य विभाग(Works) - BE/B-Tech (स्थापत्य)/ वास्तूविद्याविशारद पदवी अन्नपूरवठा विभाग(Catering) MSc(HM)/ MBA(HM)/ BSc किंवा BA प्रथम श्रेणी आणि HM मध्ये पदवीत्तर डिप्लोमा
5 विधी 22 ते 27 कायदे विषयातील पदवी धारक. उमेदवार हा वकील म्हणून ॲडव्होकेटस् ॲक्ट, 1961 द्वारा नोंदणीकृत होण्यास पात्र असावा.
6 हवाई वाहतूक नियंत्रक(ATC) 19 1/2 ते 25 वर्षे BE/B-Tech पदवीधारक (कोणत्याही शाखेतून पास) तसेच 12 वी
7 वैमानिक जनरल
CPL धारक
19 ते 24
19 ते 25
BE/B-Tech पदवीधारक (कोणत्याही शाखेतून पास) तसेच 12 वी वर्गात भौतिकशास्त्र व गणित विषय घेतलेला असावेत
उमेदवार हा वैध आणि चालू स्थितीतील DGCA India द्वारे जारी केलेला CPL धारक असावा
8 Naval Armament Inspectorate (NAI) 19 1/2 ते 25 वर्षे BE/B-Tech पदवी खालील शाखांतून प्राप्त केलेली असावी विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, यांत्रिकी, उत्पादन, इंस्टूमेंटेशन, माहिती तंत्रज्ञान, रसायन, धातू शास्त्र, एरोस्पेस अभियांत्रिकी

शैक्षणिक अधिकारीचे कार्य

शैक्षणिक अधिकारी हा नौसेना दलातील कर्मचारींना प्रशिक्षण आणि व्यवसायीक प्राविण्य विकास यांबाबत मार्गदर्शन करतो. शांततेच्या काळातील एक महत्वपूर्ण उपक्रम म्हणजे भविष्यातील नवीन योजना तयार करणे व त्यासाठी सातत्याने कर्मचारी वर्गाला आवश्यक प्रशिक्षण देणे. एखाद्या योजनेचे यश हे अधिकारी आणि इतर सहकारी कर्मचारी यांना मिळालेल्या प्रशिक्षणावर अवलंबून असते. त्यामूळे शैक्षणिक अधिकारी हा भारतीय नौसेना दलात अधिकारी आणि खलाशी (सेलर) यांच्या प्रशिक्षणा बाबत महत्वाचा भाग असतो. हा अधिकारी तांत्रिक विषयक प्रत्यक्ष तत्वांवर आधारीत शास्त्रोक्त व पद्धतशीर सूचना यांचे प्रशिक्षण सर्व नौसेना शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांना देण्यासाठी जबाबदार असतो. शैक्षणिक अधिकारी या सूचना विविध भारतीय नौसेना प्रशिक्षण संस्थांना देत असतो. सागरी मोहिमांत हवामानशास्त्र (Meteorology) आणि समुद्रशास्त्र (Oceanography)सेवा सहाय्य हा अधिकारी पुरवतो. शैक्षणिक अधिकारीविविध अभ्यासक्रम जसे पाणबुडी विरोधक (एन्टी सबमरीन वॉरफेअर), नौसेनेचे संपर्क, तोफखाना व्यवस्थापन, हायड्रोग्राफी, नेव्हीगेशन इ. विषय अभ्यासतो.

शैक्षणिक पात्रता:

भौतिक शास्त्र किंवा गणित विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची दूसऱ्या श्रेणीची Master Degree असावी.भौतिक शास्त्राची Master Degree असल्यास पदवी अभ्यासक्रमात गणित हा विषय दुय्यम पातळीवर अभ्यासलेला असावा आणि गणितात Master Degree पदवी असल्यास भौतिक शास्त्र दुय्यम पातळीवर अभ्यासलेला असावा किंवा दूसऱ्या श्रेणीची मान्यता प्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र किंवा इंग्रजी विषयाची Master Degree असावी. रसायन शास्त्रातील Master Degree असल्यास उमेदवाराने पदवी अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र विषय दुय्यम पातळीवर अभ्यासलेला असावा. किंवा इंग्रजीत प्राविण्य पदवी असल्यास भौतिकशास्त्र किंवा गणित विषय इंटरमिडीएट किंवा समांतर अभ्यासक्रम असावा किंवा यांत्रिकी, विद्यूत, संगणक शास्त्र किंवा तंत्रज्ञान विषयातील अभियांत्रिकी पदवी प्राप्त असावी. किंवा दूसऱ्या श्रेणीची, मान्यता प्राप्त विद्यापीठाची कंम्पुटर ॲप्लीकेशन किंवा संगणक शास्त्र विषयातील Master Degree असावी. उमेदवाराने पदवी अभ्यासक्रमात भौतिकशास्त्र किंवा गणित विषयाचा अभ्यासक्रम घेतलेला असावा किंवा उमेदवाराने अर्थशास्त्र / इतिहास / राज्यशास्त्र विषयात Master Degree पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठातून घेतलेली असावी.

ENQUIRE NOW