भारतीय लष्करातील कारकीर्द

भारतीय लष्कर हे फार मोठे व सामर्थशाली गणले जाते. प्रत्येक भारतीय नागरीक मग तो कोणत्याही जाती धर्मांचा, कोणत्याही दर्जाच्या घटक असल्यास व कायमस्वरूपी भारतात वास्तव्यास असल्यास भारतीय लष्करात सामिल होऊ शकतो. त्याने फक्त नेमून दिलेल्या शैक्षणिक, वयोमर्यादा, शारिरीक आणि वैद्यकिय निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे. साधारणत: वर्षातून एकदा प्रत्येक जिल्ह्यातील लष्कर भरती कार्यालया मार्फत त्यांच्या क्षेत्रात भरती प्रक्रिया राबवली जाते. सैन्यभरती किंवा अधिकारी प्रवेश प्रक्रियेबाबत जाहिरात स्थानिक वर्तमान पत्र व इतर माध्यमाद्वारे प्रकाशित केली जाते. लष्करात वेगवेगळ्या पदांसाठी वयोमर्यादा व शैक्षिणीक पात्रतेनुसार प्रवेश मिळू शकतो त्यासंबंधीत माहिती खालील प्रमाणे आहे.

1. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA)

ही अधिकारी गटासाठी प्रवेश प्रक्रिया असून UPSC द्वारे वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. UPSC द्वारे परिक्षेत पात्र ठरलेले उमेदवार ह्यांची निवड SSB च्या मुलाखतीसाठी होते. त्यातील निवडक उमेदवारांची वैद्यकिय तपासणी होवून पुढे अंतीम निवड झालेल्या उमेदवारांची देशपातळीवरील यादी प्रसारित केली जाते. NDA तील अधिकारी प्रशिक्षण घेतलेला उमेदवारहा सन्माननीय पदावर नियुक्त होणारा अधिकारी असतो. आम्ही, आचार्य अकॅडमी येथे दहावीची परीक्षा संपल्यानंतर लगेचच या परिक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करतो जेणे करून 12 वी च्या सुरूवातीला (वयोमर्यादेत) प्रवेश परिक्षा विद्यार्थी देऊ शकतो व 12 वी पास होताच NDA मध्ये प्रवेश मिळवू शकतो. दहावी नंतर लगेच तयारी केल्याने NDA प्रवेश परिक्षेसाठीचे, वयोमर्यांदेप्रमाणे जास्तीत जास्त परिक्षेचे प्रयत्न करता येतात. या प्रवेशासाठीचे पात्रता निकष पुढील प्रमाणे.

वयोमर्यादा :- 16 1/2 ते 19 1/2 वर्षे वयोगटातील उमेदवार. (प्रशिक्षण सुरू होण्याच्या दिवशी या वयोगटातच असणे आवश्यक)

शैक्षणिकपात्रतानिकष :- 12वी किंवा 10 + 2 वर्ग पध्दतीचे शिक्षण किंवा लष्करास आवश्यक त्यासमान शिक्षण पुर्ण असावे.

वैवाहिक स्थिती :- अविवाहित पुरूष फक्त.

अर्जाची पध्दत :- UPSC च्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरता येतो. याबाबत जून आणि डिसेंबर महिन्यात ऑनलाईन सूचना जारी होतात.

SSB मुलाखत :- जानेवारी प्रशिक्षण प्रवेशासाठी- सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि जुलै प्रशिक्षण प्रवेशासाठी- जानेवारी ते एप्रिल.

प्रशिक्षणसुरूवात :- जानेवारी आणि जुलै.

प्रशिक्षणसंस्था :-NDA, खडकवासला, पुणे.

प्रशिक्षणकालावधी :- 3वर्षे NDA आणि 1 वर्षे IMA यथे.

कमिशन :- Permanent Commission

2. 10 + 2 तांत्रिक प्रवेश (Technical Entry Scheme)

शाखेतील 20 जागांसाठी वर्षातून दोनदा 10 + 2 किंवा 12वी परिक्षेनंतर टेक्निकल प्रवेश घेता येतो. याप्रवेशाची जाहिरात मे/ जून आणि ऑक्टोंबर/नोव्हेंबर महिन्यात नोकरी विषयक बातमीपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यात प्रकाशित केली जाते. या प्रवेशासाठीचे पात्रता निकष पुढील प्रमाणे.

वयोमर्यादा :- 16 1/2 ते 19 1/2 वर्षे, प्रशिक्षण सुरु होण्याच्या दिवशी या वयोगटात असणे आवश्यक

शैक्षणिकपात्रतानिकष :-10+2 वर्गात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह उत्तीर्ण. (सर्व विषयांत मिळून 70% किंवा जास्त गुण)

वैवाहिक स्थिती :- अविवाहित पुरूष फक्त.

अर्जाची पध्दत :- अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सूचना जारी केल्यानंतर दिलेल्या पध्दतीने अर्ज करता येतो.

SSB मुलाखत :- जानेवारी साठी – ऑगस्ट ते ऑक्टोबर , जुलै साठी – फेब्रुवारी ते एप्रिल.

प्रशिक्षणसुरूवात :- जानेवारी आणि जुलै.

प्रशिक्षणसंस्था :-OTA, गया

प्रशिक्षणकालावधी :-5 वर्षे- (1 वर्षे OTA गया व 4 वर्षे CTWS.)

4 वर्षे पुर्ण झाल्यानंतर Permanent Commission म्हणून नियुक्त.

फेज 1 – Pre-Commissioning 1 वर्ष OTA गया येथे प्रशिक्षण आणि 3 वर्षे CME पुणे / MCTE Mhow / MCEME सिकंदराबाद येथे.

फेज 2 - Permanent Commission नियुक्ती नंतर CME पुणे / MCTE Mhow / MCEME सिकंदराबाद येथे.

कमिशन :- Permanent Commission

3. इंडियन मिलीटरी अकादमी IMA थेट प्रवेश:-

IMA येथे मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवीनंतर CDSE द्वारे थेट प्रवेश घेता येतो. यासाठी UPSC द्वारे 200 जागांसाठी वर्षातून दोनवेळा प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. या परिक्षेत जुलै आणि नोव्हेंबर महिन्यात UPSC द्वारे CDSE साठी नोकरीविषय बातमीपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत जाहिरात प्रकाशित केली जाते. आम्ही आचार्य अकॅडमी येथे पदवीच्या दुसऱ्या वर्षात किंवा शेवटच्या सत्रा पुर्वी प्रवेश परिक्षेची तयारी सुरू करतो. यामध्ये विद्यार्थांचा शैक्षणिक अभ्यासक्रम व त्यांस तयारीसाठी लागणारी गरज लक्षात घेता अभ्याक्रम सुरू केला जातो. विद्यार्थी आपली अभ्यासक्रमाची गरज व परिक्षेच्या तयारीसाठी उपलब्ध असलेला वेळ पाहून आमच्याकडे अल्पकालीन किंवा दीर्घकालीन वर्गास प्रवेश घेऊ शकतात. जेणे करून त्यांची तयारी ही परिपुर्ण होऊ शकते. याप्रवेशासाठीचे पात्रता निकष पुढील प्रमाणे.

वयोमर्यादा :- 19 ते 24 वर्षे

शैक्षणिकपात्रतानिकष :-UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सूचना जारी झाल्यानंतर अर्ज करता येतो. सूचना साधारण जुलै आणि नोव्हेंबर महिन्यात जारी होते.

वैवाहिक स्थिती :- अविवाहित पुरूष फक्त.

अर्जाची पध्दत :- अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सूचना जारी केल्यानंतर दिलेल्या पध्दतीने अर्ज करता येतो.

SSB मुलाखत :- जानेवारी प्रवेशाकरिता – ऑगस्ट /सप्टेंबर
जुलै प्रवेशाकरिता फेब्रुवारी /मार्च

प्रशिक्षणसुरूवात :- जानेवारी आणि जुलै.

प्रशिक्षणसंस्था :-IMA, डेहराडून

प्रशिक्षणकालावधी :-1 1/2 वर्षे.

कमिशन :- Permanent Commission

4. ऑफिसर ट्रेनिंग अकादमी पुरूष फक्त Officers Training Academy (Non-Technical Men).

UPSC द्वारे CDSE अंतर्गत OTA च्या तांत्रिकशाखे व्यातिरीक्त(Non-Technical) 175 जागांसाठी वर्षातून दोनदा परिक्षा घेतल्या जातात. या OTA साठी पुरूष उमेदवार पात्र ठरतात. या परिक्षासंबंधीत जाहिराती नोकरी विषयक बातमीपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत UPSC द्वारे CDSE अंतर्गत जारी केली जाते. या प्रवेशांसाठीचे पात्रता निकष पुढील प्रमाणे.

वयोमर्यादा :- 19 ते 24 वर्षे

शैक्षणिकपात्रतानिकष :-मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी.

वैवाहिक स्थिती :- अविवाहित पुरूष फक्त.

अर्जाची पध्दत :- UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सूचना जारी झाल्यानंतर अर्ज करता येतो. सूचना साधारण जुलै आणि नोव्हेंबर महिन्यात जारी होते.

SSB मुलाखत :- एप्रिल प्रवेशाकरिता नोव्हेंबर / डिसेंबर आणि ऑक्टोबर प्रवेशाकरिता मे / जून

प्रशिक्षणसुरूवात :- एप्रिल आणि ऑक्टोबर

प्रशिक्षणसंस्था :-OTA चेन्नई

प्रशिक्षणकालावधी :-49 आठवडे

कमिशन :- SHORT SERVICE COMMISSION

5. न्यायधिश महाधिवक्ता पुरूषांसाठी (Judge Advocate General) SHORT SERVICE COMMISSION (JAG)

विधी (L.L.B) विषयातील पदवीधारक या प्रवेशासाठी पात्र ठरतात. भरती कार्यालयामार्फत या जागांसंबंधात वर्षातून दोनदा नोकरीविषय बातमीपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत जाहिरात जुलै / ऑगस्ट आणि जानेवारी / फेब्रुवारी महिन्यात प्रकाशित केली जाते. या प्रवेशाबाबतचे पात्रता निकष खालील प्रमाणे.

वयोमर्यादा :- 21 ते 27 वर्षे

शैक्षणिकपात्रतानिकष :-55 % गुण प्राप्त करून L.L.B ची परिक्षा उत्तीर्ण पाहिजे तसेच बार कॉन्सिल ऑफ इंडिया / स्टेट यथे नोंदणीकृत होण्यास पात्र उमेदवारअसावा.

वैवाहिक स्थिती :- अविवाहित पुरूष फक्त.

अर्जाची पध्दत :- ऑनलाईन पध्दतीने अधिकृत संकेतस्थळांवर.

SSB मुलाखत :- डिसेंबर / जानेवारी आणि जुलै / ऑगस्ट

प्रशिक्षणसुरूवात :- एप्रिल आणि ऑक्टोबर

प्रशिक्षणसंस्था :-OTA चेन्नई

प्रशिक्षणकालावधी :-49 आठवडे

कमिशन :- SHORT SERVICE COMMISSION

6. राष्ट्रीय छात्र सेना विशेष SHORT SERVICE COMMISSION (NCC) (SPL) Entry पुरूष फक्त.

NCC वरिष्ठ गटाच्या ‘C’ प्रमाणपत्रधारक पदवीधर उमेदवार यांसाठी 50 जागांसाठी वर्षातून दोन वेळा भरती कार्यालयाद्वारे नोकरी विषयक बातमीपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत जाहिरात जून आणि डिसेंबर मध्ये प्रकाशित केली जाते. या प्रवेशाबाबतचे पात्रता निकष खालील प्रमाणे.

वयोमर्यादा :- 19 ते 25 वर्षे

शैक्षणिकपात्रतानिकष :-50% गुणांसहीत पदवी परिक्षा उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवार हा NCC सिनीअर डिव्हीजन आर्मीतील दोन वर्ष सेवेत असावा व ‘C’ प्रमाणपत्र आणि किमान ‘B’ ग्रेड प्राप्त असावा.

वैवाहिक स्थिती :- अविवाहित पुरूष फक्त.

अर्जाची पध्दत :- NCC विभागाद्वारे जारी केलेल्या सूचने द्वारा लेखी स्वरूपात अर्ज करता येतो.

SSB मुलाखत :- डिसेंबर / जानेवारी आणि जून / जुलै

प्रशिक्षणसुरूवात :- एप्रिल आणि ऑक्टोबर

प्रशिक्षणसंस्था :-OTA चेन्नई

प्रशिक्षणकालावधी :-49 आठवडे

कमिशन :- SHORT SERVICE COMMISSION

7.युनिव्ह‍‍र्सिटी एंट्री स्किम (University Entry Scheme)

अभियांत्रिकी पदवीच्या अंतीम सत्राच्या पुर्वीचे विद्यार्थी उपलब्ध असलेल्या जागांसाठी अर्ज करू शकतात. भरती कार्यालयामार्फत वर्षातून एकदाच नोकरी विषयक बातमीपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत जाहिरात जून/जुलै मध्ये प्रकाशित केली जाते. या प्रवेशाबाबतचे पात्रता निकष खालील प्रमाणे.

वयोमर्यादा :- 18 ते 24 वर्षे

शैक्षणिकपात्रतानिकष :-अभियांत्रिकी (B.E) च्या अंतीम सत्राच्या पुर्वीच्या सत्रातील, जाहिरातीत नमूद केलेल्या शाखेचे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

वैवाहिक स्थिती :- अविवा‍हित पुरूष आणि महिला सूचनेत नमूद केल्या प्रमाणे

अर्जाची पध्दत :- अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पध्दतीने

SSB मुलाखत :- नोव्हेंबर ते फेब्रुवारी

प्रशिक्षणसुरूवात :- जुलै

प्रशिक्षण कालावधी :- 1 वर्ष

प्रशिक्षणसंस्था :-OTA चेन्नई

प्रशिक्षणकालावधी :-49 आठवडे

कमिशन :- SHORT SERVICE COMMISSION

8. टेक्निकल ग्राज्यूएट कोर्स इंजिनिअर्स TGC (Engineers)

तांत्रिक विभागासाठी उपलब्ध जागांसाठी भरती मंडळामार्फत प्रवेश परिक्षा घेतली जाते. या जागांसंबंधीत जाहिरात भरती कार्यालयामार्फत वर्षातून एकदाच नोकरी विषयक बातमीपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत जाहिरात मार्च / एप्रिल आणि सप्टेंबर / ऑक्टोबर मध्ये प्रकाशित केली जाते. या प्रवेशाबाबतचे पात्रता निकष खालील प्रमाणे.

वयोमर्यादा :- 20 ते 27 वर्षे

शैक्षणिकपात्रतानिकष :-B.E/ B. Tech पदवीधर (जाहिरातीत नमूद केलेल्या शाखेतील फक्त)

वैवाहिक स्थिती :- अविवा‍हित पुरूष आणि महिला सूचनेत नमूद केल्या प्रमाणे

अर्जाची पध्दत :- अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पध्दतीने

SSB मुलाखत :- मार्च / एप्रिल आणि सप्टेंबर / ऑक्टोबर

प्रशिक्षणसुरूवात :- जानेवारी आणि जुलै.

प्रशिक्षण कालावधी :- 1 वर्ष

प्रशिक्षणसंस्था :-IMA, डेहराडून

प्रशिक्षणकालावधी :-49 आठवडे

कमिशन :- SHORT SERVICE COMMISSION

9. SHORT SERVICE COMMISSION (टेक्निकल) पुरूषांसाठी फक्त.

Short Service Commission द्वारे तांत्रिक विभागासाठी उपलब्ध जागांसाठी वर्षातून दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. अभियांत्रिकी पदवीधरांसाठी भरती कार्यालया मार्फत वर्षातून एकदाच भरती कार्यालयाद्वारे नोकरी विषयक बातमीपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत जाहिरात जून / जूलै आणि डिसेंबर / जानेवारी जाहिरात प्रकशित केली जाते. या प्रवेशाबाबतचे पात्रता निकष खालील प्रमाणे.

वयोमर्यादा :- 20 ते 27 वर्षे

शैक्षणिकपात्रतानिकष :-B.E पदवी (सूचनेत नमूद केलेल्या शाखेतील फक्त)

वैवाहिक स्थिती :- अविवा‍हित पुरूष आणि महिला सूचनेत नमूद केल्या प्रमाणे

अर्जाची पध्दत :- अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पध्दतीने

SSB मुलाखत :- डिसेंबर / जानेवारी आणि जून / जूलै

प्रशिक्षणसुरूवात :- एप्रिल आणि ऑक्टोबर.

प्रशिक्षणसंस्था :-OTA चेन्नई

प्रशिक्षणकालावधी :-49 आठवडे

कमिशन :-Permanent Commission

10. Army Educational Corps (AEC) पुरूषांसाठी फक्त

उपलब्ध जागांसाठी वर्षातून दोनदा मार्च / एप्रिल आणि सप्टेंबर / ऑक्टोबर मध्ये भरती कार्यालयाद्वारे नोकरी विषयक बातमीपत्र, स्थानिक वर्तमानपत्र यांत जाहिरात जून / जूलै आणि डिसेंबर / जानेवारी . जाहिरात प्रकशित केली जाते. या प्रवेशाबाबतचे पात्रता निकष खालील प्रमाणे.

वयोमर्यादा :- 23 ते 27 वर्षे

शैक्षणिकपात्रतानिकष :-MA / MSc. प्रथम किंवा द्वितीय श्रेणीत जाहिरातीत नमूद केलेल्या विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण उमेदवार पात्र ठरतात.

वैवाहिक स्थिती :- विवा‍हित आणि अविवा‍हित पुरूष उमेदवार फक्त.

अर्जाची पध्दत :- अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पध्दतीने

SSB मुलाखत :- मार्च / एप्रिल आणि सप्टेंबर / ऑक्टोबर

प्रशिक्षणसुरूवात :- जानेवारी आणि जुलै.

प्रशिक्षण कालावधी :- 1 वर्ष

प्रशिक्षणसंस्था :-IMA, डेहराडून

कमिशन :- Permanent Commission

11. आर्मी कॅडेट कॉर्प (ACC)

भारतीय सेना दलात सैनिक म्हणून कार्यरत असलेल्या उमेदवारांसाठी अधिकारी म्हणून संधी या द्वारे उपलब्ध होते. दिलेले निकष पुर्ण करणाऱ्या सैनिकास प्रशिक्षण घेऊन उपलब्ध जागांवर बढती घेण्याची संधी सरकार देते. 10+2 किंवा 12 वी पास असलेले जवान ACC द्वारे पदवी प्राप्त करून पुढे IMA चे प्रशिक्षण घेऊन अधिकारी दर्जा प्राप्त करू शकतात. NDA आणि ACC हे साधारण एकाच प्रकारचे प्रशिक्षण देतात. या प्रवेशा बाबतीतची जाहिरात कार्यालया मार्फत वर्षातून दोनदा मार्च आणि ऑगस्ट महिन्यात 75 जागांसाठी प्रकाशित केली जाते. पात्रता निकष पुढील प्रमाणे .

वयोमर्यादा :- 20 ते 27 वर्षे पर्यंत लष्करी सेवेत किमान दोन वर्षे कार्यरत असणारे सैनिकच या जागांसाठी अर्ज करू शकतात

शैक्षणिकपात्रतानिकष :-10+2 वर्ग किंवा 12 वी पास किंवा त्या समान शिक्षण घेतलेला उमेदवार ACC ची लेखी प्रवेश परिक्षा उत्तीर्ण असावा.

वैवाहिक स्थिती :- अविवा‍हित किंवा विवा‍हित पुरूष

SSB मुलाखत :- जानेवारी प्रवेशाकरिता सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये जुलै प्रवेशाकरिता मार्च ते मे मध्ये.

प्रशिक्षणसुरूवात :- जानेवारी आणि जुलै.

प्रशिक्षण कालावधी :-चार वर्षे - 3 वर्षे ACC विंग मध्ये 1 वर्षे IMA मध्ये

प्रशिक्षणसंस्था :-ACC विंग, IMA डेहराडून येथे

कमिशन :- Permanent Commission

12. Permanent Commission स्पेशल लिस्ट (PC (SL) )

ही प्रवेश पध्द्ती साधारण ACC प्रमाणे काही फरक करून घेतली जाते. वर्षातून एकदाच शंभर जागांसाठी एप्रिल आणि जुलै महिन्यात सूचना जारी केल्या जातात. JCO / NCO दर्जाच्या जवानांस यासाठी पात्र समजले जाते. पात्रता निकष पुढील प्रमाणे

वयोमर्यादा :- कमाल वय 42 वर्षे / अभियंतासाठी वय 45 वर्षेपर्यंत आणि IOB करीता वय 45 वर्षे मर्यादा अश्या जवानांसाठी ज्यांचा सैन्यात 10 वर्षे सेवा काळ पूर्ण आहे.

शैक्षणिकपात्रतानिकष :-किमान 10वी आणि पुढे

वैवाहिक स्थिती :- अविवा‍हित / विवा‍हित पुरूष (JCO / NCO पदी कार्यरत असलेले शिपाई वगळता)

SSB मुलाखत :- जुलै प्रवेशाकरिता सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये

प्रशिक्षणसुरूवात :- जुलै

प्रशिक्षण कालावधी :-IMA येथे चार आठवडे

प्रशिक्षणसंस्था :-AEC केंद्र आणि महाविद्यालय येथे आठ आठवडे आणि IMA येथे चार आठवडे

कमिशन :- Permanent Commission

13. SCO.

किमान पाच वर्ष सैन्यात सेवा काळ पूर्ण केलेले जवान हे या प्रवेशासाठी पात्र ठरतात. जवान किंवा हवालदार किंवा JCO पदावरील सैनिक या साठी अर्ज करू शकतात. शंभर जागांसाठी वर्षातून दोनदा एप्रिल आणि जुलै महिन्यात विभागा अंतर्गत सूचना काढल्या जातात. (किंवा यूनिटस् मध्ये सूचना काढल्या जातात) पात्रता निकष पुढील प्रमाणे.

वयोमर्यादा :- 30 ते 35 दरम्यान, आणि किमान 5 वर्ष सैन्यात सेवा काळ पूर्ण असावा.

शैक्षणिकपात्रतानिकष :-किमान 10 वी आणि एक वर्ष डिप्लोमा किंवा त्यापेक्षा जास्तीचे शिक्षण.

वैवाहिक स्थिती :- अविवाहित / विवाहित पुरूष

SSB मुलाखत :- जानेवारी प्रवेशा करिता - जुलै/ऑगस्ट जुलै प्रवेशा करिता - नोव्हेंबर/डिसेंबर

प्रशिक्षणसुरूवात :-जानेवारी व जुलै

प्रशिक्षण कालावधी :-OTA गया

प्रशिक्षणसंस्था :-आठ आठवडे AEC येथे आणि OTA गया येथे एक वर्ष कमिशन

14. टेरिटोरिअल आर्मी (Territorial Army)

टेरिटोरिअल आर्मी ही पूर्ण सेवा करीता नोकरी किंवा व्यवसाय नसून दूय्यम दर्जाची सेना असते. सर्वसामान्य नागरिक स्वयंसेवक म्हणून टेरिटोरिअल आर्मी मध्ये वर्षातील काही दिवस गणवेषात देशसेवा करू शकतात. आपात्कालीन परिस्थीतीत शस्त्र घेऊन देशाचे रक्षण करण्यासाठी युद्धात ही आर्मी तयार असते. यातील प्रवेशाबाबत वर्षातून दोनदा टेरिटोरिअल आर्मी मार्फत सूचना जाहीर होतात. उपलब्ध जागांसाठीच फक्त प्रवेश प्रक्रिया होते. या प्रवेशाबाबतचे पात्रता निकष खालील प्रमाणे

वयोमर्यादा :- 18 ते 42 वर्षे

शैक्षणिकपात्रतानिकष :-मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी

वैवाहिक स्थिती :- अविवा‍हित / विवा‍हित पुरूष उमेदवार फक्त.

SSB मुलाखत :- ऑगस्ट / सप्टेंबर आणि मे / जून

प्रशिक्षणसुरूवात :-जानेवारी व जुलै

प्रशिक्षण कालावधी :-नियुक्ती प्रशिक्षण - 30 दिवसांसाठी TA बटालियन मध्ये.
वार्षिक प्रशिक्षण कॅम्प - प्रशिक्षण वर्षातील दोन महिने.
कमिशन नंतरचे कमिशन - कमिशन वर नियुक्त झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तीन महिने IMA येथे.

15. रिमाइंड आणि वेटरनअरी कॉर्प (RVC)

भारतीय सैन्य दलातील प्रशासकिय सेवा प्रकारातील ही एक अधिकारी दर्जाची प्रवेश प्रकिया असते. सैन्यदलात वापरात येणारे घोडे, कुत्रे आणि इतर पशूंची देखभाल, पशू वैद्यकिय सेवा पुरविणे, त्याला आवश्यकच ते प्रशिक्षण देणे या सेवांचा यात समावेश असतो. Short Service Commission दर्जाच्या या पदासाठी आवश्यकतेनुसार नोव्हेंबर/डिसेंबर मध्ये RVC dept द्वारे सूचना प्रकाशित केल्या जातात. या प्रवेशाबाबतचे पात्रता निकष खालील प्रमाणे

वयोमर्यादा :- 21 ते 32 वर्षे

शैक्षणिकपात्रतानिकष :-B. Vsc. आणि AH

वैवाहिक स्थिती :- अविवाहित किंवा विवाहित पुरूष फक्त

SSB मुलाखत :- सप्टेंबर/ऑक्टोबर

प्रशिक्षण स्थान :- RVC मिरत

प्रशिक्षण कालावधी :-तीन महीने

कमिशन :- Permanent Commission

16. आर्मी मेडिकल कॉर्प (AMC-NT)

सैन्यातील वैदयकिय सेवे साठी यात प्रवेश घेता येतो. NT अधिकारी हा डॉक्टर नसून इतर प्रशासकिय सेवा, दळणवळण इतर सेवेत कार्यरत असतो. या पदासाठी उपलब्ध जागांसाठी AMC मार्फत सूचना प्रकाशित केली जाते. पात्रता निकष खालील प्रमाणे.

वयोमर्यादा :- कमाल 42 वर्ष

शैक्षणिकपात्रतानिकष :-किमान 10 वी

वैवाहिक स्थिती :- अविवाहित किंवा विवाहित पुरूष फक्त

SSB मुलाखत :- नोव्हेंबर/डिसेंबर

प्रशिक्षण स्थान :- AMC CENTRE & COLLEGE

प्रशिक्षण कालावधी :-तीन महिने

कमिशन :- Permanent Commission

17. आर्मी पोस्टल सर्विस (APS)

लष्करी टपाल सेवा ही सरकारी उपक्रर्मांतर्गंत चालवलेली लष्करी टपाल सेवा असून टपालाची देवाण-घेवाण करणे हे मूख्य कार्य हा विभाग सांभाळतो. दोन लष्करी ठाण्यांदरम्यान सेवा पुरवणे हे त्यांचे मुख्य काम असते. या सेवेसाठी भारतीय टपाल सेवेतील कर्मचारी आणि आर्मी कॉर्प मधील जवानांना प्रथम या सेवेत घेतले जाते. पात्रता निकष खालील प्रमाणे.

वयोमर्यादा :- कमाल 45 वर्षे

शैक्षणिकपात्रतानिकष :-किमान 10 वी व पुढे

वैवाहिक स्थिती :- अविवाहित किंवा विवाहित पुरूष फक्त

SSB मुलाखत :- सप्टेंबर/ऑक्टोबर

जवान आणि JCO भरतीसाठीचे पात्रता निकष.

सैनिक टेक्निकल शाखा शिक्षण वय
1. सैनिक (जनरल) सर्व (शाखांसाठी) 10 वी / मॅट्रिक परिक्षा किमान 45% गुण प्राप्तकरून उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 33% गुण असावेत. 17 1/2 ते 21 वर्षे
2. सैनिक तांत्रिक(तांत्रिकी शाखा तोफखाना, आर्मी एअर डिफेन्स) अ) सैनिक टेक्निकल = 10 + 2 / इंटरमिडिएट परिक्षा शास्त्रशाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र गणित आणि इंग्रजी विषयांसहित किमान 50% गुणांसहित उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण असावेत.
ब) सैनिक टे‍क्निकल (एव्हीएशन आणि ॲम्यूनिशन एग्झामिनर) 10 + 2 / इंटरमिडिएट परिक्षा शास्त्रशाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र गणित आणि इंग्रजी विषयांसहित किमान 50% गुणांसहित उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण असावेत.
17 1/2 ते 23 वर्षे
3. सैनिक-लिपीक, तांत्रिक विभागाचा भांडार नियंत्रक(सर्व दलांसाठी) 10 + 2/ इंटरमिडिएट कोणत्याही शाखेतून (शास्त्र, कला, वाजिण्य)किमान 60% गुण व 50% गुण प्रत्येक विषयात असावेत. इंग्रजी/ अकाउंटस/ बुक-किपींग याविषयात 50% गुण 12 वी वर्गात प्राप्त करणे अनिवार्य आहे. 17 1/2 ते 23 वर्षे
4. सैनिक-नर्सिंग असिस्टंट (आर्मी मेडिकल कॉर्प) 10 + 2/ इंटरमिडिएट शास्त्र शाखेतून - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषय घेवून सर्वसाधारण किमान 50% गुण 12 वी वर्गात प्राप्त करून उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण असावेत. 17 1/2 ते 23 वर्षे
4. सैनिक-नर्सिंग असिस्टंट (आर्मी मेडिकल कॉर्प) 10 + 2/ इंटरमिडिएट शास्त्र शाखेतून - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषय घेवून सर्वसाधारण किमान 50% गुण 12 वी वर्गात प्राप्त करून उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण असावेत. 17 1/2 ते 23 वर्षे
5. शिपाई-फार्मा (आर्मी मेडिकल कॉर्प) 10 + 2 किंवा समान दर्जाची परिक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र इंग्रजी विषय घेवून पास असणे आवश्यक
D. Pharm किमान 55% गुणासहित उत्तीर्ण आणि स्टेट फार्मसी कॉन्सिल/ फार्मसी कॉन्सिल ऑल इंडिया मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक.
B. Pharm पदवीधारक किमान 50% गुण घेवून उत्तीर्ण असावा आणि स्टेट फार्मसी कॉन्सिल/ फार्मसी कॉन्सिल ऑल इंडिया मध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक.
19 ते 25 वर्षे
6. सैनिक-नर्सिंग असिसटेंट व्हेटरनरी (RVC) 10 + 2/ इंटर शास्त्र शाखेतून - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषय घेवून सर्वसाधारण किमान 50% गुण 12 वी प्राप्त करून उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण असावेत. 17 1/2 ते 23 वर्षे
7. सैनिक ट्रेडसमेन सर्वशाखांसाठी सेस, मेस किपर, हाऊस किपर वगळता 10 वी पास. सर्वसाधारण ठाराविक टक्के गुणांची आवश्यकता नाही पण प्रत्येक विषयात 33% गुण आवश्यक 17 1/2 ते 23 वर्षे
8. सैनिक ट्रेडसमेन सेस, मेस किपर, हाऊस किपर 8 वी पास. सर्वसाधारण ठराविक टक्के गुणांची आवश्युकता नाही पण प्रत्येक विषयात 33% गुण आवश्यक 17 1/2 ते 21 वर्षे
9. Survey Automated Cartographer(Engineers) उमेदवार BA/BSc गणित विषय घेवून उत्तीर्ण असावा. 12 वी (10+2) किंवा त्यासमान वर्ग हा गणित आणि शास्त्र हे मुख्य विषय घेवून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 20 ते 25 वर्षे
10. Junior Commissioned officer (JCO) धार्मिक प्रशिक्षक (सर्व सैन्यदलांसाठी) JCO (धार्मिक प्रशिक्षक) या विशेष नियुक्तीसाठीचा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याच बरोबर उमेदवार हा खालील पैकी कोणतीही एक धार्मिक उपाधी धारक किंवा प्रशिक्षण घेतलेला असावा.
1. पंडित आणि पंडित (गोरखा) गोरखा पलटणसाठी हा उमेदवार हिंदू धर्मातील असावा आणि संस्कृत विषयात 'आचार्य' किंवा 'शास्त्री' पदवी प्राप्त आणि 'कर्मकांड' या विषयात एक वर्षांचा (डिप्लोमा) अभ्यासक्रम केलेला असावा
2. ग्रंथी: शिख धर्मातील उमेदवार हा पंजाबी मधील 'ग्यानी' पदवी प्राप्त असावा.
3. मौलवी आणि मौलवी (शिया) लडाख स्कॉट मुस्लिम धर्मातील हा उमेदवार अरेबिक मध्ये मौलवी अलीम किंवा उर्दु मध्ये अलीम अलीम असावा.
4. पार्द्री: धर्मोपदेशक अधिकारी मंडळामार्फत नियुक्त केलेल्या धर्मोपदेशक व्यक्ती यास पात्र ठरतात. सदर व्यक्ती स्थानिक बिशप यांच्या मान्यता प्राप्त व्यक्तींपैकी असावी.
5. बुध्द धर्मगुरू (महायाना) ज्यास मुख्य मठाधिकारी यांनी धर्मोपदेशक म्हणून नियुक्त केले आहे अशी व्यक्ती यास पात्र ठरते. मुख्य मठाधिकारी हा मठातून खंपा किंवा लोपोन किंवा रबजाम यात ‘होशी’ म्हणजे PhD प्रमाणपत्र धारक असावा.
टिप: वर नमूद केलेली शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. वरील पात्रता निकष हे. "लष्करी सेवेत असणाऱ्या" आणि "सामान्य नागरिक" या सर्वांना समान लागू पडतात.
25 ते 34 वर्षे
11. JCO केटरिंग(आर्मी सर्व्हिस कॉर्प) 10 + 2 किंवा त्या समान परिक्षा उत्तीर्ण असाणे आवश्यक आणि स्वयंपाकशास्त्र (cookery)/हॉटेल व्यवस्थापन आणि केटरिंग टेक्नॉलाजी या विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा फुड क्राफ्ट इंस्टिट्यूटचा डिल्पोमा किंवा शैक्षणिक प्रमाणपत्राचा एक वर्षाचा किंवा जास्त कालावधीचा अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा. AICTE ची मान्यता असणे आवश्यक नाही. 21 ते 27 वर्षे
12. हवालदार-प्रशिक्षण विभाग (आर्मी एज्यूकेशन कॉर्प) ग्रुप x = MA/MSc/MCA किंवा BA/BSc/BCA/BSc (IT) यापैकी पदवी BEd पदवी सहीत असणे आवश्यक ग्रुप Y = BSc/BA/BCA/BSc (IT) (BEd आवश्यक नाही) 20 ते 25 वर्ष
13. सैनिक जनरल ड्यूटी (महिला मिलिट्री पोलीस) उमेदवाराचे किमान शिक्षण हे मॅट्रिक/10वी/SSLC किंवा त्या समान वर्गाचे आवश्यक असून किमान 45% गुण सर्व विषयांत मिळवून आणि किमान 33% गुण प्रत्येक विषयात असावेत. यासाठी ठराविकच विषय असणे आवश्यक नाही
टिप: लष्करी सेवेतील कर्मचारी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या विधवेसाठी वयाची अट 30 वर्ष (जास्तीत जास्त वय) पर्यंत शिथिल केलेली आहे.
17 1/2 ते 21 वर्ष

ENQUIRE NOW