Blog

NDA ची तयारी करु इच्छिणाऱ्यांसाठी

NDA ची तयारी करु इच्छिणाऱ्यांसाठी:

विद्यार्थी मित्रहो तुम्हाला असे वाटते का की जगातल्या सर्वात उंच शिखरावर चढून हे जग कसे दिसते ते पहावे, -53°C मध्ये जीवन कसे असते ते अनुभवावे, समुद्राच्या तळाशी जीवन कसे असते ते पहावे, घनदाट जंगलात फिरावे, विविध प्रकारच्या संस्कृतींचा अमोल ठेवा असलेला देश फिरावा, ती संस्कृती अनुभवावी आणि हे सगळे करत असताना भारतमातेचे रक्षण करुन आपले कर्तव्यही बजवावे. तर मग तुमच्यासाठी सर्वोतम प्रगतीच्या वाटा म्हणजे भारतीय सशस्त्र सेना दल (Indian Military Forces) काहींच्या दृष्टीने आयुष्यात पैसे कमावणे खुप महत्तवाचे असते.तर काहींच्या दृष्टीने आयुष्य जगणे खुप महत्त्वाचे असते तुम्हाला जर आयुष्य जगायचे असेल तर तुम्ही बिनधास्त भारतीय सेना दलात अधिकारी व्हा कारण येथेच कसे जगायचे हे शिकवले जाते.आज या लेखात 

NDA जाण्यासाठी काय करावे लागते याची माहीती आपण घेणार आहोत.

NDA तील प्रशिक्षण नंतरची सैन्य दलातील सेवा

NDA म्हणजेच National Defense Academy (राष्ट्रीय संरक्षण अकादमी), हे सामान्य कॉलेज नाही सैन्य दलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच ते प्रशिक्षण केंद्र आहे. 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी जे NDA च्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आले आहेत त्यांना गुणवत्तायादी प्रमाणे NDAत प्रवेश दिला जातो. हे विद्यार्थी NDA तील तीन वर्षांच्या प्रशिक्षणा दरम्यान आपला पदवी अभ्यासक्रम (Graduation) शारिरिक प्रशिक्षण, मानसिक प्रशिक्षणआणि सैनिकी प्रशिक्षण (Military training) पुर्ण करतात. हे प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर विद्यार्थी NDA तून Pass out होऊन पुढच्या प्रशिक्षणासाठी पुढच्या अकादमीत जातात . येथे एक वर्षाचे प्रशिक्षण पुर्ण केल्यावर विद्यार्थी सैन्य दलात अधिकारी होतो. ही प्रथम दर्जाची (Class one) नियुक्ती असते. शेवटच्या वर्षापासून 25000/- stipend(भत्ता) नंतर अधिकारी झाल्यापासून पुर्ण पगार मिळायला सुरवात होते.

NDA च्या निवड प्रक्रीये संबंधी :-  

NDA च्या निवडप्रक्रियेचे प्रमुख चार टप्पे असतात

  1. लेखी परिक्षा 

  2. मुलाखत (SSB)

  3. वैद्यकीय चाचणी (Medical)

  4. गुणवत्ता यादी.

लेखी परिक्षा 11 वी नंतरच घेतली जाते. यात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी मुलाखतीसाठी म्हणजेच SSB ला जातात. SSB उतीर्ण होणारे विद्यार्थी वैद्यकीय चाचणीला जातात. यात वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या होतात. सर्व चाचण्या व्यवस्थीत पार पडल्यास विद्यार्थ्यास “Medically fit” असा शेरा दिला जातो. लेखी परिक्षा मुलाखत यांच्या मार्कांच्या आधारावर त्यांची गुणवत्ता यादी तयार होते. गुणवत्ता यादी नुसार त्यांना NDA प्रवेश मिळतो. गुणवत्तायादी बारावीचा रिझल् लागल्यानंतर लागते. निवड प्रक्रियेस एकूण एक वर्षाचा काळ लागतो.

  1. आता आपण लेखी परिक्षेची माहीती घेऊया

लेखी परीक्षा एकूण 900 मार्कांची असते यात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, चालु घडामोडी, सामान्यज्ञान, इंग्रजी इत्यादी विषयांचा 8 वी ते 12 वी पर्यंतचा अभ्यासक्रम असतो.


लेखी परीक्षा महत्त्वाची आहे कारण 99%  विद्यार्थी या परिक्षेत स्पर्धेतून बाहेर होतात. या परिक्षेच्या तयारीत नुसतचं  गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांचा अभ्यास करुन भागत नाही. कट ऑफ हा प्रत्येक विषयातील मार्कांसाठी असतो. त्यामुळे सर्व विषयांचा अभ्यास करावाच लागतो. यातील प्रश्नही नेहमीच्या प्रश्नांसारखे नसतात. अभ्यासातील नियमीतपणामुळे विषयांचा अभ्यास पुर्ण होऊ शकतो. आपल्या वागण्यातील नियमीतपणा ही एक ऑफीसर्स क्वालिटी आहे. लेखी परिक्षेसाठी रोजचे वर्तमान पत्र वाचन महत्त्वाचे आहे. चालु घडामोडी, सामान्यज्ञान यांच्या तयारी बरोबरच इतरही अनेक गोष्टींची तयारी यातून होते. याची  अधिक माहीती आपण इंग्रजीचे स्पर्धा परिक्षेतील महत्त्व या पुढील लेखात पाहूया. नियमीतपणा, विषयाचे ज्ञान या बरोबरच लेखी परिक्षेत मिलिटरी ॲप्टीटयुड तपासला जातो. आपल्या वागण्यातला नियमीतपणा, आपले निरीक्षण कौशल्य (Observation skills), आपले कार्य कौशल्य (Working skills) इत्यादी गोष्टी या मध्ये येतात.

 या परिक्षेत गणितात 120 प्रश्न 150 मिनटात तर दुसऱ्या पेपरमध्ये 150 प्रश्न 150 मिनिटात सोडवायचे असतात; म्हणजेच एका मिनिटात एक प्रश्न सोडवावा लागतो.

अन्य परिक्षांच्या तुलनेत हा वेळ फारच कमी असतो. JEE/CET अश्या परीक्षांमध्ये गणितात 30 च प्रश्न असतात व वेळ 120 मिनिटांचा असतो तर NDA च्या परिक्षेत हे प्रश्न 120  म्हणजे चौपट असतात व वेळ फक्त 30 मिनिटेच जास्त असतो. अन्य परिक्षांमध्ये फक्त भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचे प्रश्न असतात पण NDA च्या परिक्षेत या व्यतीरिक्त जीवशास्त्र ,भुगोल, इतिहास  अश्या नऊ विषयांवर प्रश्न असतात.

या नऊ विषयातलेच पाच विषय मर्चंन्ट नेव्हीच्या CET मध्ये असतात त्यामुळे  NDAबरोबर या परिक्षेची तयारीही करता येते. ज्याला आपण Plan B असे म्हणू शकतो. Plan B  व त्याच्या नियोजनाची काळजी आपण Plan B  या पुढील लेखात पाहुयात.


लेखी परिक्षेत भरपूर विषय व भरपूर अभ्यासक्रम असतो. लेखी परिक्षा ही 11 वी नंतरच   12 वी च्या परिक्षेच्या आधीच द्यायची  असते. सर्व विषयांचा 8 वी ते 12 वी पर्यंन्तचा अभ्यासक्रम पुर्ण करणे व परिक्षेतील प्रश्न एका मिनिटात सोडवण्याची तयारी करणे यासाठी कमी कालावधी असतो. 11वी व 12 वी चा अभ्यासक्रम एका वर्षातच पुर्ण करावा लागतो. म्हणूनच तो व्यवस्थित पुर्ण करण्यासाठी लवकर सुरुवात करणे गरजेचे आहे. आम्ही साधारणपणे 10 वी नंतर 1 मे पासून तयारी सुरु करतो तेव्हा बारावीच्या सुरुवातीलाच म्हणजे पुढील वर्षाच्या जूनमध्ये अभ्यासक्रम व्यवस्थित पुर्ण होतो. यामुळे NDA तील यशा बरोबर CME आणि NA  च्या परिक्षांसाठीची तयारीही साध्य होते. सैन्य दलात अधिकारी होण्याचे हे अन्य दोन पर्याय आहेत.

लेखी परिक्षा ही अकॅडमीक स्वरुपाची असते. अभ्यासक्रम खुप जास्त असल्याने नियोजन गरजेचे आहे. प्रत्येक प्रकारणाचे भाग पाडून कोणत्या दिवशी आपण कोणता भाग पुर्ण करणार हे जर आपण ठरवले तर लक्षात येईल की पहिल्या दिवसापासूनच नियमीत प्रत्येक दिवसाचा अभ्यास पुर्ण केला तर अभ्यासक्रमाचे क्ष्य (टारगेट) पुर्ण करता येईल.  हे टारगेट पुर्ण करतानाच प्रश्न एका मिनीटात सोडवण्याचे कौशल्य देखील कमावता येईल. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवायला घ्यायला लागतील कारण आता परिक्षाही समोर येऊन ठेपली असेल.


मुलाखत (SSB ची तयारी)

लेखी परिक्षेनंतरचा पुढचा टप्पा म्हणजेच मुलाखत Interview by Service Selection Board (SSB)ह्या परिक्षेत प्रामुख्याने आपल्या व्यक्तीमत्त्वाची आणि आपल्यातील Officer like Qualities ची तपासणी केली जाते. आपला आचार, विचार आणि वाचा यातील ताळमेळ यात तपासला जातो. विविध सामाजीक प्रश्न (चालु घडामोडी) त्यावरचे आपले विचार व त्या विषयांबदलची  आपली माहीती यात तपासली जाते. ही परिक्षा लेखी परिक्षेनंतर असते पण याची तयारी ही सुरवाती पासूनच करावी लागते व्यक्तीमत्वातील बदल पटकन  होत नाहीत. ग्रुप टेस्टस्, सायकॉलॉजीकल टेस्टस, इंन्टरव्हयु अशा विविध प्रकारच्या परिक्षा यात होतात. ही परिक्षा संपुर्ण इंग्रजीतून होते. इंग्रजीतून बोलणे, लिहीणे, वाचणे, ऐकणे या सर्व कौशल्यांची गरज असतें. याची सखोल माहीती पुढील लेखात पहाणार आहोतच. SSB परिक्षा म्हणजे केवळ मैदानी परिक्षा नव्हे. जवान भरतीसारख्या मैदानी चाचण्या यात होत नाहीत. आपल्यातले नेतृत्त्व गुण तपासण्यासाठी  विविध प्रकारच्या चाचण्या होतात. या चाचण्या गटांमध्ये होतात. यासाठी आपणास आपल्यासारख्या ऑफीसर होऊ इच्छिणाऱ्या गटा बरोबर सराव करणे गरजेचे आहे.

मुलाखत ही एकूण पाच दिवस चालते. यात बऱ्याच प्रकारच्या टेस्ट चालतात या टेस्टस् ची सखोल  माहिती  आपण तयारी  SSBची या पुढील लेखात पाहू.


NDA ची तयारी - 11वी प्रवेश 

NDAच्या लेखी परिक्षेचे विषय व पेपर सोडवण्याची कौशल्ये या बद्दल आपण माहीती घेतली

NDA परिक्षेत गणिताला फार महत्त्व आहे. 300 मार्कांचा संपुर्ण स्वतंत्र पेपर आहे. संरक्षण दलात वायुसेना व नौसेना यात जाण्यासाठी गणित व शास्त्र या विषयांचा अभ्यास अनिवार्य आहे. NDA ची तयारी करतानाच 11वी 12 वी चा अभ्यास संपवणे  आवश्यक आहे. यासाठी शास्त्र शाखेची निवड ही फायद्याची राहील. गणित, भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र व इंग्रजी यांमुळे आपल्याला सर्व Officer entries चे पर्याय खुले राहतील तसेच NDA 11 वी यातील अभ्यास सारखा झाल्याने अभ्यासाचा ताण कमी राहील कॉमर्स व आर्टस् शाखांची निवड करुन NDA त जाता येईल पण या साईडसना फक्त ARMY हा एकमेव पर्याय खुला राहील व परिक्षेसाठी शास्त्र शाखा व गणित यांचा अभ्यास करावाच लागेल. यासाठी शास्त्र शाखेची निवड ही फायद्याची राहील.

सर्वसाधारणपणे प्रत्येक विद्यार्थ्याला लेखी परिक्षेला बसण्याची संधी तीन ते चार वेळा मिळते.   

      बारावीच्या परिक्षेनंतर NDAच्या तयारीसाठी कमी कालावधी मिळतो परिक्षेला बसण्याची संधी 

      कमी वेळा मिळते. यामुळे पहिल्या प्रयत्नात यश मिळाल्यास पुढच्या वेळेस पुन्हा परिक्षा   

            देण्याची संधी मिळवायची असेल तर दहावीनंतरच 1 मे पासून तयारी सुरू केलेली उत्तम.

            तेव्हा विद्यार्थी मित्रांनो 10 वी पास होणारच आहात, चांगले कॉलेज मिळेलच   

      आणि पसंतीचे किंवा सोईचे कॉलेज नाही मिळाले तरी बहिस्थ: विद्यार्थी, NIOS असे पर्याय खुले 

      आहेतच. मग आपले NDA चे स्वप्न पुर्ण करण्यासाठी 10 वी नंतर निकालाची वाट पहात थांबू नका

      एप्रिलमध्ये छान गिर्यारोहणाचे किंवा  अन्य प्रकारचे कॅम्प करा ताजेतवाने व्हा व 1 मे पासून NDA च्या

अभ्यासाला सुरुवात करा.

पंथ है प्रशस्त शुर साहसी बढे चलो, वीर बनो , धीर  बनो,  ग्याने गंभीर बनो बिजलीके तीर बनो ,बढे चलो |
बढे चलो|


ENQUIRE NOW