Blog

NDA ची प्रवेश परिक्षा आणि इंग्रजीची आवश्यकता.

NDA म्हणजेच National Defence Academy (राष्ट्रीय संरक्षण अकादमी) येथे प्रशिक्षण पुर्ण करुन विद्यार्थी सैन्य दलात अधिकारी म्हणून रुजु होतो.NDA च्या परिक्षेचे चार प्रमुख टप्पे येतात लेखी परिक्षा, मुलाखत (SSB) वैद्यकीय चाचणी, गुणत्ता यादी. या परिक्षांमध्ये इंग्रजीचे महत्त्व खुपच जास्त आहे. दोन्ही परिक्षा लेखी मुलाखत या संपुर्ण इंग्रजीतून होतात. मुलाखतीच्या वेळेस इंग्रजीतून बोलणे म्हणजे आपल्यात धाडस नाही असा अर्थ लावला जाऊ शकतो. (अर्थात यासाठी अन्य काही निकषही असतात) लेखी परिक्षेमध्ये व्याकरणावर अधारीत 200 मार्कांचे प्रश्न विचारतात तर मुलाखत ही पाच दिवसांची असते ज्यात सर्व कामकाज इंग्रजीतूनच चालते TAT,WAT,SRT,GP, अश्या विविध टेस्ट इंग्रजीतूनच लिहायच्या असतात तर G.D, Lecturate, Interview अश्या परिक्षांमध्ये इंग्रजीतून बोलायचे असते. थोडक्यात इंग्रजी हा या परिक्षांचा अविभाज्य भाग आहे.

इंग्रजीचा अभ्यास चांगला करण्यासाठी पुढील गोष्टी करणे गरजेचे आहे

1.  व्याकरणाचा अभ्यास

2.  शब्दसंग्रह वाढविणे

3. इंग्रजीतून पुढील क्रिया करणे

a) बोलणे b)लिहीणे c)वाचणे d)ऐकणे e)विचार करणे.

व्याकरण हाच वाक्याचा पाया असतो. शब्दांची योग्य जुळणी करुन वाक्य तयार होते संवाद साधता येतो. लेखी परिक्षेत सर्व प्रश्न व्याकरण शब्दसंग्रह यावर आधारीत असतात . योग्य तज्ञाकडून व्याकरण शिकावे तसेच परिक्षेतिल प्रश्न  प्रकार ते सोडवण्यांची पध्द्त माहित करुन घ्यावी. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी इंग्रजी वृत्तपत्र रोज मोठ्यांदा वाचावे यातून बोलण्याचा सराव होईल,योग्य पध्द्तीने वाचन करण्याचा सराव होईल, इंग्रजीची आकलन क्षमता वाढेल, चालु घडामोडी (current affairs), सामान्यज्ञान (G.K) याचीही तयारी होईल. या वाचनाचा लेखी परिक्षेसाठीही खुप फायदा होतो. महत्त्वाच्या मुद्यांची नोंद करावी यातून G.D.,Lecturate ची तयारी होईल.


आपल्यासारख्या ध्येयवादी मित्रांचा गट करावा व त्यांच्या बरोबर इंग्रजीतून संभाषण करावे. आपल्या चुका योग्य व्यक्तीकडून दूरुस्त करुन घ्याव्यात. टि.व्ही वरील गट चर्चा, बातम्या इंग्रजीतून ऐकव्यात. समोरच्याची प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी उचलू नये ती आपल्या व्यक्तीमत्त्वास साजेशी आपल्या विचारास पटेल अशी मांडावी तेही आपल्या शब्दात यामुळे तूम्ही स्वत:चे विचार मांडत आहात अशी परिक्षकाची खात्री होईल.


स्पर्धा परिक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे थोडे फिरवून हुशारीने विचारलेले असतात. प्रश्न विचारले असतात एका नियमावर पण कौशल्यपुर्ण शब्दानकंण आठवण भलत्याच नियमांची करुन देतात. एका पेक्षा जास्त संज्ञाचा (concepts चा) गुंता केलेला असु शकतो. उदा. ‘No Sooner’ नंतर ‘than’ येते. परंतु वाक्यात ‘than’ ऐवजी ‘then’ वापरतात त्याच्या आधीच्या वाक्यात वेळेशी संबंधीत वाक्यरचना करतात त्यामुळे ‘then’चा वापर योग्य वाटतो परिक्षेच्या घाईगर्दीत ही चुक लक्षात येत नाही. यासाठी प्रश्न सोडवण्याची पध्द्त व्यवस्थीत तयार करावी लागते जेणे करुन ह्या चुका होणार नाहीत. रोजच्या व्यवहारात आपण काही गोष्टी संदर्भातून समजून घेतो त्यामुळे आपण व्याकरण दृष्ट्या पुर्ण वाक्ये करत नाही. याच गोष्टीचा फायदा घेत परिक्षेत फिरक्या घेतल्या जातात. या सापळ्यात फसायचे नसेल तर अश्या प्रश्नांचा सतत सराव करणे गरजेचे आहे. हे प्रश्न नेहमीच्या प्रश्नांपेक्षा थोडे वेगळे असतात. येथे पर्याय दिलेले असल्याने  प्रश्नात पुर्ण माहीती स्पष्ट करतातच असे नाही. प्रश्न वाचण्याच्या सोडवण्याच्या सरावाने या गोंष्टींवर मात करता येतेप्रश्नांची भाषा त्यातील फिरक्या घेण्याची पध्द्त ही सरावाने आत्मसात होते. थोडक्यात NDA परिक्षेत यश मिळवण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावे हे प्रभुत्व NDA च्या परिक्षा पध्द्तीनुसार (as per pattern) असावे.

परिक्षेत यशस्वी होण्यासाठी नेमका अभ्यासक्रम पुर्ण करावा अभ्यासक्रम खुप जास्त असल्याने त्याचे योग्य नियोजन करावे सराव ठेवावा शुभेच्छा !!!

ENQUIRE NOW